31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
HomeमुंबईCoronavirus : मुंबईतील कोरोना 'हे ४ मंत्री' रोखणार!

Coronavirus : मुंबईतील कोरोना ‘हे ४ मंत्री’ रोखणार!

टीम लय भारी

मुंबई : देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. खासकरुन मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईमध्ये वाढणारी कोरोनाची संख्या रोखण्यासाठी आता राज्य सरकारने नवीन रणनीती आखली आहे. मुंबईत कोरोनाला अटकाव करण्याची जबाबदारी आता ४ मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे.

कोरोनाग्रस्तांच्या रुग्ण संख्येनुसार मुंबईचे विभाग पाडण्यात आले आहेत. या प्रत्येक विभागाची जबाबदारी एका मंत्र्यावर सोपवण्यात आली आहे. संबंधित विभागात अन्नधान्य देणे, रुग्णांची व्यवस्था करणे, क्वारंटाईन व्यवस्था, आरोग्य सुविधा यांचा समन्वय करण्याची जबाबदारी हे मंत्री पार पाडणार आहेत.

मुंबईची जबाबदारी दिली जाणा-या मंत्र्यांमध्ये नवाब मलिक, वर्षा गायकवाड, अनिल परब आणि अस्लम शेख यांचा समावेश आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी